अमर्त्य सेन ((नोबेल पारितोषीक विजेते )
अमर्त्य सेन अमर्त्य सेन ( बांग्ला : অমর্ত্য সেন , उच्चार - ओमोर्तो शेन ; रोमन लिपी : Amartya Sen ) (३ नोव्हेंबर, इ.स. १९३३ - हयात) हे बंगाली -भारतीय अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र [श १] व सामाजिक पर्याय सिद्धान्त [श २] या विषयांतील कार्यासाठी इ.स. १९९८ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. [१] गरिबी ,आरोग्य ,शिक्षण , मानवी विकास आणि एकूणच मानवी कल्याण त्यांच्या विचाराचा गाभा आहे . भारतीय केंद्रशासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी इ.स. २००७ साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे [श ३] हे अध्यक्ष आहेत [२] एकूण ४० वर्षात, ३०हून अधिक भाषांत अमर्त्य सेन यांची पुस्तके प्रकाशित झाली आहे. ते 'ऑक्सब्रिज कॉलेज'चे पहिले आशियाई प्रमुख आहेत. प्रारंभिक जीवन आणि शिक्षण [ संपादन ] अमर्त्य सेनचा जन्म बंगालमधील , ब्रिटिश भारतातील एका बंगाली हिंदू वैद्य कुटुंबात झाला होता. रवींद्रनाथ टागोर यांनी ...